जळगावमध्ये आदिवासी मुलीवर बलात्काराचा प्रयत्न

December 30, 2010 9:23 AM0 commentsViews: 2

30 डिसेंबर

जळगाव जिल्ह्यातल्या चोपडा तालुक्यात आदिवासी मुलींच्या सरकारी वसतिगृहात एका मुलीवर बलात्काराचा प्रयत्न झाल्याची घटना घडली. या प्रकरणी एका संशयित तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. पण घटना घडल्यानंतर वसतिगृह व्यवस्थापन तीन दिवस पोलिसात तक्रार देण्यासाठी टाळाटाळ करीत होते. त्यामुळे पीडित मुलीने स्वतः पोलिसात तक्रार दिली. त्यानंतर हा गंभीर प्रकार उघड झाला. आदिवासींच्या कल्याणासाठी असलेली वैजापूरची आदिवासी आश्रमशाळा.या निवासी शाळेत राहात असलेली एक युवती सकाळी शौचासाठी बाहेर गेल्यावर नाना पावरा याने तिच्यावर अतिप्रसंग करायचा प्रयत्न केला. युवतीने आरडाओरड केल्याने तो युवक पळून गेला.पण या प्रसंगाने घाबरलेल्या मुलीची तक्रार मात्र या शाळेच्याच व्यवस्थापनाने दाबुन टाकण्याचा प्रयत्न केला.अखेर या मुलीने स्वत: पोलीस ठाणे गाठले.या घटनेने मात्र अनेक धक्कादायक गोष्टी उघडकीस आल्या आहेत.तब्बल 10 एकर परिसर असलेल्या या निवासी आश्रमशाळेतील जवळपास सर्वच विद्यार्थ्यांना शौचासाठी बाहेरंच जावं लागतं. कारण शौचालयांची दुरावस्था आणि पाण्याचा तुटवडा याबद्दल चक्क शाळेच्या शिक्षकांनीच कबूल केलं.

close