वैनगंगा नदीच्या पात्रात अवैध वाळू उपसा सर्रास सुरू

December 30, 2010 9:26 AM0 commentsViews: 132

30 डिसेंबर

भंडारा जिल्ह्यातील वैनगंगा नदीच्या पात्रात मोठ्याप्रमाणात वाळू माफिया अवैध वाळू उपसा करत आहे. नदी पात्रातून जेसीबी किंवा पोकलँड मशीनच्या सहाय्याने वाळूचा उपसा करण्याचे काम सर्रास सुरू आहे. यासाठी नदिपात्रात रस्ता तयार करुन नदीच्या नैसर्गिक मार्गात अडथळा तयार केला जात आहे. अशा प्रकारच्या वाळू उपशामुळे खाण विभाग आणि पर्यावरण विभागाची सरळसरळ पायमल्ली होती. नदीपात्रात दोन मीटरपर्यंत खोदकाम करुन वाळू उपशाची परवानगी आहे.मात्र हे काँन्ट्र्‌ॅक्टर्स नियम धाब्यावर बसवून 5 ते 6 मीटरपर्यंत नदीच्या पात्रात खोदकाम करता. विशेष म्हणजे हा सगळा प्रकार खणिकर्म विभागाच्या आणि जिल्हा प्रशासनाच्या आशिर्वादामुळे चालला असा नागरिकांचा आरोप आहे.

close