मालेगाव बॉम्बस्फोटाप्रकरणी अभिनव भारत संघटनेचा खजिनदार चौकशीसाठी ताब्यात

November 2, 2008 5:25 AM0 commentsViews: 3

2 नोव्हेंबर, जबलपूरमालेगाव बॉम्बस्फोटाप्रकरणी एटीएसनं आणखी एक कारवाई केली आहे. अभिनव भारत संघटनेचा खजिनदार अशोक चावला याला एटीएसनं जबलपूरमधून ताब्यात घेतलं आहे. मालेगाव बॉम्बस्फोटप्रकरणी एटीएसनं अभिनव भारत संघटनेच्या कार्यकर्त्यांवर केलेली ही तिसरी कारवाई आहे. यापूर्वी अभिनव भारत संघटनेचा उपाध्यक्ष मायाराम जसवानी याच्या जबलपूरमधल्या घरावर एटीएसनं कारवाई केली होती. अभिनव भारतच्या समीर कुलकर्णीला एटीएसनं अगोदरच अटक केली आह. समीरला नाशिकच्या एका कोर्टानं 10 दिवसांची पोलीस कोठडीही सुनावली आहे.

close