स्वतंत्र तेलंगणाबाबत श्रीकृष्ण समिती गुरुवारी सादर करणार अहवाल

December 30, 2010 9:57 AM0 commentsViews: 3

30 डिसेंबरस्वतंत्र तेलंगणाबाबत जस्टीस श्रीकृष्ण समिती आज आपला रिपोर्ट सादर करणार आहे. केंद्रीय गृहमंत्री पी.चिदंबरम यांना ही समिती आज रिपोर्ट सादर करणार आहे.श्रीकृष्ण समितीच्या सदस्यांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांनी सरकारला अनेक पर्याय सुचवलेत आणि त्या प्रत्येक पर्यायाचे परिणाम आणि दुष्परिणामाबाबतही माहिती दिल्याचे सांगितले.या पार्श्वभूमीवरआंध्र प्रदेशमध्ये सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली. स्वतंत्र तेलंगणाचा वाद आज मिटणार की हा वाद आणखी चिघळणार हे येणार काळचं ठरवेल.

close