पुण्यात काँग्रेसची निदर्शन ; संभाषणाची टेप फॉरेन्सिक लॅबकडे

December 30, 2010 10:06 AM0 commentsViews: 2

30 डिसेंबर

शिवसेनेच्या नेत्या नीलम गोर्‍हे आणि शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांचे पीए मिलिंद नार्वेकर यांना अटक करण्याच्या मागणीसाठी पुण्यात आज काँग्रेसने निदर्शन केली. पुण्यात बंददरम्यान दंगल भडकवणे आणि तोडफीडाला चिथावणी दिल्याच्या आरोपाप्रकरणी पोलिसांनी या दोघांवर गुन्हे दाखल केले आहेत. नीलम गोर्‍हे आणि मिलिंद नार्वेकर यांच्यात याबाबत झालेलं संभाषण रेकॉर्ड करुन त्या आधारावर काल गुन्हे दाखल करण्यात आले. दरम्यान रेकॉर्ड केलेल्या संभाषणाची टेप फॉरेन्सिक लॅबकडे टेस्टसाठी पाठवण्यात आली. त्याचा रिपोर्ट आल्यानंतर योग्य ती कारवाई करू असं पुणे पोलिसांनी स्पष्ट केले.

close