दादोजींचा पुतळा का हलवला ? कोर्टानं मागीतलं स्पष्टीकरण

December 30, 2010 3:02 PM0 commentsViews: 7

30 डिसेंबरपुण्यातील दादोजी कोंडदेव यांचा पुतळा लालमहालातून हलवू नये यासाठी पांडुरंग बलकवडे यांनी याचिका दाखल केली होती. या याचिकेवर आज सुनावणी झाली. याचिकेवर महापालिकेला आपलं म्हणणं मांडण्यासाठी तीन जानेवारीपर्यंत मुदत देण्यात आली आहे. पुतळा हटवण्याच्या ठरावाला स्थगिती मिळावी यासाठीची ही याचिका होती. मात्र याचिका सुनावणीला येण्याआधीच पुतळा हटवण्यात आला. त्यानंतर पुतळा पुन्हा बसवला जावा असं त्यांनी याचिकेत म्हटलं आहे. त्याचबरोबर इतर 56 नागरिक आणि संघटनांनी देखील आपलं म्हणणं मांडण्यासाठी अर्ज दाखल केले.

close