अरुण बोरुडे यांची आत्महत्या ; प्रत्यक्षदर्शीचा जबाब

December 30, 2010 4:00 PM0 commentsViews: 2

30 डिसेंबर

पवई बलात्कार प्रकरणी मुख्य आरोपी अरुण बोरुडे यांचा मृतदेह श्रीरामपूरच्या रेल्वे ट्रॅकवर काल आढळला. अरुण बोरुडे यांचा मृत्यू नेमका कशामुळे झाला. बोरुडेंनी आत्महत्या केली की तो अपघात होता यावर चर्चा सुरु होती. तर ही घटना ज्या प्रत्यक्षदर्शीचानी पाहिली त्यांच्या म्हणण्यानुसार मोबाईलवर बोलत असताना अरुण बोरुडे यांनी स्वतःला रेल्वेखाली झोकून दिलं होतं. या बद्दल अधिक तपास मनमाड रेल्वे पोलिस निरिक्षक रामनाथ चोपडे हे करत आहेत. बोरुडे यांनी आत्महत्या केल्याचे गेल्या चोवीस तासांच्या तपासामधून समोर आलं आहे.

close