कांदा निर्यातबंदीच्या विरोधात शेतकर्‍यांचं आंदोलन

December 30, 2010 4:17 PM0 commentsViews: 2

30 डिसेंबर

कांदा, कापूस, साखर आणि डाळी यांच्या निर्यातबंदी विरोधात नाशिकमध्ये शेतकरी संघटनेने आंदोलन केले. मुंबई-आग्रा महामार्गावर मानवी साखळी करून रस्त्यावरून जाणार्‍या गाड्यांमधल्या लोकांना त्यांनी कांदे वाटले. नाशिक जिल्ह्यातले 400 शेतकरी यात सहभागी झाले होते. निर्यातबंदी लादणार्‍या सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणांचा यावेळी निषेध करण्यात आला.

close