कोल्हापूरमध्ये एकाच दिवशी 7 मुलांचा मृत्यू

December 31, 2010 9:27 AM0 commentsViews: 2

31 डिसेंबरकोल्हापूर इथल्या छत्रपती प्रमीलाराजे रुग्णालयात एकाच दिवशी सात बालकांचा मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे. जंतूसंसर्गामुळे ही घटना घडल्याचे छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालय प्रशासनाचे म्हणणे आहे. 24 डिसेंबर रोजी रात्री ही घटना घडली. ह्या रुग्णालयात नवजात बालकांसाठी अतिदक्षता विभाग आहे. या विभागात जन्मजात कमकुवत,अत्यंत कमी वजनाच्या आणि कमी महिन्यात प्रसूत झालेल्या नवजात मुलांना उपचारासाठी ठेवलं जातं. एकाच दिवशी सात मुलांचा मृत्यू झाल्यानं हॉस्पीटल प्रशासन खडबडुन जागे झाले. प्रशासनाने हा वार्ड तात्काळ बंद केला आहे. करुन ह्या वार्डाचे निर्जंतुकीरण केलं. त्याचबरोबर ह्या संदर्भात चाकैशी समितीही नेमण्यात आली.

close