नव वर्षाचं स्वागत करण्यासाठी पोलीस प्रशासन सज्ज

December 31, 2010 9:55 AM0 commentsViews: 6

31 डिसेंबर

31 डिसेंबरचे सेलिब्रेशन आणि नववर्षाचे स्वागत करण्यासाठी सगळीकडेच उत्साह असतो. पण याच पार्श्वभूमीवर काही घातपात होऊ नये यासाठी मुंबई पोलिसांनी जय्यद तयारी केली. शहरभर चेकपोस्ट तयार करण्यात आले आहेत. प्रत्येक गाडीची तपासणी केली जात आहे. तसेच अनेक ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरेही बसवण्यात आलेत, त्याचबरोबर पुरेसा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार असल्याची माहितीही पोलिसांनी दिली. तसेच गेट वे ऑफ इंडियाच्या परिसरात पार्किंगला परवानगी नाकारण्यात आली. तसेच 31 डिसेंबरला रात्री दहा वाजल्यानंतर फटाक्यांवर बंदी कायम राहणार असल्याचंही पोलिसांनी स्पष्ट केले. आणि सेलिब्रेशन करणार्‍यांसाठी एक आनंदाची बातमी म्हणजे आज रात्री दीड वाजेपर्यंत शहरातील बार आणि पब्ज खुले राहणार आहेत. तर वाईन शॉप्स पहाटे पाच वाजेपर्यंत सुरू राहणार आहेत.

close