‘आयडियाची कल्पना’ प्रीमियर दिमाखात पार

December 31, 2010 10:37 AM0 commentsViews: 4

31 डिसेंबरआयडियाची कल्पना या चित्रपटातून सचिन, महेश कोठारे आणि अशोक सराफ हे सुपरस्टार त्रिकूट प्रथमच एकत्र येत आहे. सिनेमाची निर्मिती आणि दिग्दर्शन सचिनने केलं. आयडियाची कल्पनाचा प्रीमियर काल मुंबईत दिमाखात पार पडला. या प्रीमियर शोसाठी ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचनादिदी, महेश मांजरेकर, नितीन देसाई, सचिन खेडेकर, निर्मिती सावंत, सिद्धार्थ जाधव यांच्यासह इंडस्ट्रीतील अनेक मान्यवर उपस्थित होते. हा सिनेमा आज राज्यभर मोठ्या प्रमाणात प्रदर्शित होत आहे.

close