दादोजींचा पुतळा हलवून काय मिळाले मराठा महासंघाची संभाजी ब्रिगेडवर टीका

December 31, 2010 10:42 AM0 commentsViews: 59

31 डिसेंबरपुण्यातील लाल महालमधील दादोजी कोंडदेव पुतळा वाद हा केवळ राजकीय आहे असं मत मराठा महासंघाचे अध्यक्ष शशीकांत पवार यांनी व्यक्त केले. दादोजी कोंडदेवांचा पुतळा हटवण्याची आताच गरज नव्हती. त्याने मराठी माणसाचे काय भलं होणार आहे असा सवालही पवार यांनी केला. मराठ्यांमध्ये भांडणं लावण्यासाठी हा वाद पुढे आला. तर मनसेसारखे पक्ष या वादाला ब्राम्हण-मराठा असा रंग देताहेत असा आरोपही त्यांनी केला.

close