रायगड येथे जागर पद्मदुर्गचा कार्यक्रम थाटात साजरा

December 31, 2010 10:52 AM0 commentsViews: 3

31 डिसेंबर

रायगड जिल्ह्यातील मुरुड येथील पद्मदुर्ग उर्फ कासा किल्ल्यावर जिल्ह्यातील शिवप्रेमींनी ''जागर पद्मदुर्गचा'' कार्यक्रम थाटात साजरा केला. शिवरायांनी बांधलेल्या समुद्रातील हा किल्ला यावेळी ढोल ताश्यांनी दुमदुमला. या महोत्सव मुरुड नगरपरिषद यांनी हा कार्यक्रम आयोजित केला. या कार्यक्रमाचा पर्यटकांनी भरपूर आनंद लुटला.गणेशपूजन, गोंधळाने या कार्यक्रमाची रंगत वाढवली. तर दुसरीकडे किल्ल्याच्या तटबंदीवर दिवसभर मावळे उभे होते. या महोत्सवाच्या निमित्ताने शिवप्रेमींनी येणार्‍या पर्यटकांसमोर इतिहास सादर केला.

close