कोल्हापूरमध्ये ब्राउन शुगर विक्रेतांना पोलीसांनी पकडले

December 31, 2010 11:41 AM0 commentsViews: 8

30 डिसेंबर

कोल्हापूरात न्यु एअर पार्टीसाठी आणलेले पन्नास लाख रुपये किंमतीचे अर्धा किलो ब्राउन शुगर पोलीसांनी पकडले आहे. ब्राउन शुगर विकणार्‍या दोघां युवकांनाही पोलिसांनी अटक केली. कोल्हापूर आणि परिसरात न्यु एअर पार्टीसाठी ब्राउन शुगर विक्रीसाठी येणार असल्याची माहिती कोल्हापूर पोलिसांना मिळाली होती.आज सकाळी दोन युवक एन.सी.सी ऑफिस परिसरात ब्राउन शुगर विक्रीसाठी आलेत अशी माहिती पोलिसांनी मिळाली. त्यानंतर कोल्हापूर पोलिसांनी ब्राउन शुगर खरेदीसाठी आपले पंटर पाठविले. व्यवहार सुरु असतानाच पोलिसांनी तिथे जावुन ह्या दोन युवकांना अटक केली. त्याच्याकडुन पन्नास लाखाहुन अधिक किंमतीचे अर्धा किलो ब्राउन शुगर जप्त केले.अटक केलेले दोन्हीही युवक कर्नाटक मधले असल्याचे पोलिसानी सांगीतले.यात मोठी टोळी कार्यरत असल्याचा पोलिसांचा संशय आहे.

close