वाढदिवसाला होर्डिंग लागता कामा नये – राज ठाकरे

December 31, 2010 1:41 PM0 commentsViews: 5

30 डिसेंबर

मुंबईत नव वर्षाचं स्वागत करण्याठी रंग सुरांचे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात राज ठाकरे यांची मुलाखत चांगलीच रंगली. त्यांनी सगळ्या प्रश्नांना आपल्या खुमासदार शैलीत उत्तरं दिली. याचवेळी आपल्या वाढदिवसाला नव्या वर्षात होर्डिंग्ज लावली जाऊ नये. तसे केल्यास पक्षीय कारवाई केली जाईल असंही राज यांनी स्पष्ट केलं.

प्रशांत दामले फॅन फाऊंडेशन आयोजित आणि चंद्रलेखा प्रकाशित संस्थेने रंग सुरांचे या संगीत मैफिलीचे आयोजन केले आहे. 31 डिसेंबरला दुपारी 12 ते पहाटे 2 वाजेपर्यंत दादरच्या शिवाजी मंदिरात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं आहे. राज ठाकरे यांची मुलाखत विठ्ठल कामत यांनी घेतली.

close