पुणे महापालिका तोडफोड प्रकरणी निरपराध नगरसेवकांवर ही गुन्हे दाखल

December 31, 2010 4:36 PM0 commentsViews: 2

अद्वैत मेहता, पुणे

31 डिसेंबर

दादोजी कोंडदेव यांचा लालमहालातील पुतळा हटवण्यावरून पुण्यात सुरू झालेला संघर्ष थांबायला तयार नाही. पुतळा हटवल्यानंतर महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत आणि महापौरांच्या ऑफिसमध्ये भाजप सेना मनसेच्या नगरसेवकांनी तोडफोड आणि याला प्रत्युत्तर म्हणून काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी शिवसेना आणि भाजपच्या कार्यालयांची नासधूस केली पण पोलिसात दिलेल्या तक्रारीत तोडफोडीमधे सहभागी नसलेल्या नगरसेवक, आमदारांची नावं दिल्याने या निरपराध नगरसेवक आणि आमदारांना बदनामीला आणि कारवाईला सामोर जावे लागत आहे. या खोडसाळपणाचा आता निषेध केला जातोय.तर अनेक दोषींवर गुन्हाच नोंदवलेला नाही.

पुणे महापालिकेच्या इतिहासात 27 डिसेंबरचा दिवस काळा दिवस म्हणून नोंदला गेला. महापालिका प्रशासनाने मध्यरात्री चोरीछिपे दादोजींचा पुतळा हलवला आणि चिडलेल्या सेना भाजप नगरसेवकांनी महापालिकेच्या मुख्य सभागृहात प्रचंड तोडफोड केली. लगोलग सेना भाजप कार्यालयाचीही काँग्रेस राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी मोडतोड केली. महापौरांनी आयुक्तांकडे तक्रार केल्यानंतर शिवाजीनगर पोलीस ठाण्यात विरोधी पक्षांच्या लोकप्रतिनिधींवर गुन्हे नोंदवण्यात आला. सेनेच्या विजय मारटकरांनीही सत्ताधार्‍यांविरोधात तक्रार केली. दोन्ही बाजूंच्या नगरसेवकांना पोलिसांनी अटकही केली काहीवेळातच जामीनावर सुटकाही केली पण खोडसाळपणे तोडफोडीमध्ये सामील नसलेल्यांविरोधात गुन्हे नोंदले गेले तसेच सहभागी असूनही काही जणांविरोधात मैत्रीखातर तक्रारही केली गेली नाही यामुळे आरोप-प्रत्यारोपाचे राजकारण सुरू झालं आहे.

पोलिसांनी तक्रारीवरून सर्वांवर कारवाई केली असली तरी तोडफोडीचे चित्रीकरण करूनच चार्जशीट दाखल केली जाईल असं स्पष्ट केलं. पण तक्रारीमुळे सर्वांना अटक होण आणि जामीनावर सुटका करून घेणं अपरिहार्य आहे.

close