सेलिब्रेशनसाठी दारु नको दूध प्या पुण्यात अभिनव आंदोलन

December 31, 2010 4:39 PM0 commentsViews: 6

31 डिसेंबर

सरत्या वर्षाला निरोप देताना आणि नवीन वर्षाचं स्वागत करताना बेधडक मद्यपान करत सेलिब्रेशन केले जाते. पण दारूचे दुष्परिणाम पाहता तरूणाईने दारू ऐवजी दूध प्यावे याकरता पुण्यात 31 डिसेंबरला अभिनव आंदोलन करण्यात आलं. स्वाभिमान संघटना आणि भरारी ग्रुपतर्फे पुण्यातील कॉलेजमध्ये सरत्या वर्षाआधी 4 दिवस जागृती करण्यात आली आणि 31 डिसेंबरला वाईन शॉप्स आणि बारच्या बाहेर दूध प्राशन करत तसेच नागरिकाना दूधाच्या बाटल्या वाटत सरकारच्या पहाटे 5 पर्यंत वाईन शॉप्स उघडी ठेवण्याच्या निर्णयाचा निषेधही करण्यात आला.

close