नव वर्षानिमित्त साईबाबांच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी

January 1, 2011 9:54 AM0 commentsViews: 2

01 जानेवारी

नव्या वर्षाच्या निमित्ताने मंदिरांमध्येही भाविकांची दर्शनासाठी गर्दी झाली. शिर्डीतल्या साईमंदिरातही भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली. कालपासूनच (शुक्रवारपासून) लाखोंच्या संख्येने भाविक शिर्डीत दाखल झाले. सर्व साईभक्तांना बाबांचे दर्शन व्हावं यासाठी साईमंदिर रात्रभर खुलं ठेवण्यात आलं होतं. नववर्षानिमित्त भाविक आजही दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात दाखल झाले.

नवीन वर्ष आनंदात जावे यासाठी साईभक्त शिर्डीत दाखल झालेत. लाखोंच्या संख्येने आलेल्या साईभक्तांना शिर्डीत राहण्याची, जेवणाची आणि दर्शनाची चोख व्यवस्था देण्याचा प्रयत्न साईबाबा संस्थानने केला.

close