नाशिकमध्ये शेतकर्‍यांचं सामूहिक ‘शोले स्टाईल’ आंदोलन

January 1, 2011 10:13 AM0 commentsViews: 1

01 जानेवारी

नाशिकमधल्या चांदवड तालुक्यातल्या विटावे गावात कांदा उत्पादक शेतकर्‍यांनी सामूहिक आत्महत्या करण्याची धमकी दिली. त्यासाठी गावातल्या पाण्याच्या टाकीवर हे शेतकरी चढले आणि शोले स्टाईल आंदोलन करत त्यांनी आत्महत्येची धमकी दिली. या गावकर्‍यांनी कृषीमंत्र्यांचा पुतळाही जाळण्याच प्रयत्न केला. गावातील पाण्याच्या दीडशे फूट उंचीच्या टाकीवर हे शेतकरी चढून बसले आहेत. गावकर्‍यांनी त्यांना समजावण्याचा प्रयचत्नही करतायत, पण आंदोलक ऐकण्याच्या मनस्थितीत नाहीत.अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानाची भरपाई द्यावी आणि निर्यातबंदी मागे घ्यावी ह्या प्रमुख मागण्या शेतकर्‍यांच्या आहेत.

close