पुण्यात गुलाबाच्या प्रदर्शनाने नववर्षाचे स्वागत

January 1, 2011 2:15 PM0 commentsViews: 2

01 जानेवारी

रंगीबेरंगी टवटवीत हिवाळी गुलाबाच्या प्रदर्शनाने पुण्यात नववर्षाचे स्वागत झाले. टिळक स्मारक मंदिरात रोझ सोसायटीतर्फे 82 वं हिवाळी गुलाब प्रदर्शन भरवण्यात आलं आहे. यावेळी गुलाबांबाबत सर्वकाही माहिती असणारी एक वेबसाईटही सुरू करण्यात आली. 69 वेगवेगळ्या जातींची मोठी, मध्यम, छोटी जवळपास 2000 हून अधिक गुलाबाची फुलं या प्रदर्शनात आहेत. पुणे, सातारा, सांगली जिल्ह्यातील पॉलीहाऊसेस तसेच हौशी गुलाब प्रेमींनी या प्रदर्शनात भाग घेतला. सर्वोत्कृष्ट गुलाबाच्या फुलांना किंग, क्वीन, प्रिन्स, प्रिन्सेस असं नाव दिली गेली आहे.

close