हिंगोलीत मतीमंद आणि कुष्ठरोगी कलाकारांचं अनोख सेलीब्रेशन

January 1, 2011 2:30 PM0 commentsViews: 32

01 जानेवारी

नव वर्षाचं स्वागत म्हटलं तर मोठ मोठ्या पाटर्‌या,संगीतवर बेभान होणारी तरुणाई, आकाशदिपून टाकणारी आतषबाजी असं स्वरुप थर्टी फस्टच्या रात्री सर्वत्र पाह्यालं मिळतं मात्र हिंगोलीत अंध, अपंग, मतीमंद आणि कुष्ठरोगी कलाकारांनी वेगवेगळ्या कला सादर करून नव्या वर्षाचं स्वागत केलं. स्वरानंदन वन नावाने हा विशेष कार्यक्रम सादर करण्यात आला. 150 कलाकार असलेला हा ऑर्केस्ट्रा चंद्रपूरमधल्या आनंदवनच्या कलाकारांचा आहे. आनंदवनातल्या सामाजिक कार्याला मदत करण्याच्या उद्देश्याने हा ऑर्केस्ट्रा सादर केला जातो. मराठी, हिंदी, चित्रपट गीतांसह बांबू नृत्य आणि अभिनयाची मैफिल या ऑर्केस्ट्रात असते.

close