मराठी अमराठी वादाचा रिक्षाचालकांवर परिणाम नाही

November 2, 2008 5:42 AM0 commentsViews: 2

2 नोव्हेंबर, मुंबईगोविंद तुपेमराठी आणि अमराठी वाद पेटलेला आहे. राजकीय पुढार्‍यांनी त्याचं भांडवल करण्याचा प्रयत्न केलाय. पण त्यांच्या वादाचा सर्वसामान्यांवर मात्र काही परिणाम झालेला दिसत नाही.मुंबईत जवळपास एक लाख दहा हजार अधिकृत रिक्षा आहेत. अनधिकृत रीक्षांचा तर हिशोबच नाही. त्यापैकी पन्नासटक्के रिक्षाचालक हे उत्तर भारतीय आहेत. तर पन्नास टक्के मराठी, दाक्षिणात्य आणि इतर प्रांतांचे आहेत. मराठी- अमराठी वाद झाला असला तरी हातावर पोट असलेल्या या रिक्षावाल्यांमध्ये वाद झालेला नाही.शंकर, गोपाळ आणि ब्रिजेश चव्हाण मुंबईतल्या सायन भागात रिक्षा चालवतात. शंकर हा मूळचा कोकणातला आहे. तर ब्रिजेश हा यूपीचा. बस्ती जिल्ह्याचा राहणारा आहे. पण यांच्या मनात एकमेकांबद्दल मात्र कोणत्याही प्रकारचा राग दिसत नाही. ' आम्ही सगळे खूप चांगले मित्र आहोत. आमच्यातले बरेच लोक तर मराठीच आहेत. मराठी-अमराठी वादाचा आम्हाला काही फरक पडत नाही. आम्ही एकमेकांबरोबर मिळून मिसळून रहातो ' , असं ब्रिजेश चव्हाण या रिक्षावाल्यानं सांगितलं.इमाने इतबारे काम करत आपल्या रोजी रोटी साठी झगडणार्‍या या रिक्षाचालकांच्या मनात ना भाषेचा वाद आहे , ना कोणत्या प्रांताचा त्यामुळे गेल्या कित्येक दिवसांपासूनपासून राजकीय पुढार्‍यांनी सुरू केलेला भाषेच्या आणि प्रांतिक वादाला या रिक्षाचालकांनी मात्र छेद दिलेला दिसून येतोय.

close