कोरेगाव भीमा येथील विजयस्तंभाला दलित बांधवांची मानवंदना

January 1, 2011 2:38 PM0 commentsViews: 214

01 जानेवारी

पुणे जिल्ह्यातल्या कोरेगाव भीमा इथं विजयस्तंभाला भेट देण्यासाठी दलित बांधवांनी गर्दी केली. 1 जानेवारी 1818 रोजी महार बटालियनच्या 500 सैनिकांनी पेशव्यांना लढाईत हरवलं होतं. महार बटालियनच्या शौर्याचे प्रतिक म्हणून कोरेगाव भीमा इथं ब्रिटिशांनी विजयस्तंभ बांधला. राज्याच्या कानाकोपर्‍यातून लाखो दलित बांधव या प्रेरणास्थानाला भेट देतात. डॉ. बाबासाहेब आंबेडकरही नेहमी मानवंदना देण्यासाठी याठिकाणी यायचे. महिला तरूणांची हजेरी लक्षणीय असते.

close