हुंड्यासाठी अडून बसलेल्या नवरदेवाला अटक

January 1, 2011 2:56 PM0 commentsViews: 5

01 जानेवारी

हुंड्यासाठी अडून बसलेल्या नवरदेवाला बोहल्यावर चढण्याआधी गजाआड होण्याची वेळ औरंगाबाद इथं आली. विशेष म्हणजे खुद्द नवरी मुलीनंच नवरदेवाविरूध्द पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. हुंडा मागणार्‍या मुलासोबत आपण लग्न करणार नाही असं ठणकावून सांगितलं. शेखर बनकर आणि स्वाती राव यांचे लग्न आज दुपारी एक वाजता औरंगाबादच्या बालाजी कार्यालयात होणार होतं. मात्र आधी हुंड्याचे पैसे द्या, मगच बोहल्यावर चढू असा हट्टा नवर्‍याने धरला. वडीलधार्‍यांनी समजावून सांगितल्यानंतरही शेखर ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. त्यामुळे स्वाती आणि तिच्या आईने हे लग्न मोडण्याचा निर्णय घेतला. आणि दोघींनी पोलिसात जाऊन शेखरच्या विरूध्द गुन्हा दाखल केला. या प्रकरणी पोलिसांनी शेखरला अटक केली.

close