जादूटोणाच्या संशयावरुन वृद्ध दाम्पत्याची हत्या

January 1, 2011 3:03 PM0 commentsViews: 5

01 जानेवारी

नागपूरच्या मौदा तालुक्यातल्या चिंगोरी गावात एका वृद्ध पती-पत्नीची हत्या करण्यात आली. वृद्ध दाम्पत्य जादूटोणा करीत असल्याच्या संशयावरून त्यांची हत्या करण्यात आली. याच कुटुंबातल्या आणखी दोघांना जबर मारहाण करण्यात आली आहे. त्यामुळे त्यांना पोलिसांनी हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं आहे. याप्रकरणी आता पोलिसांनी तिघांना अटक केली. आणि आरोपींवर ऍट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातल्या एका आरोपीच्या पत्नीचा काल मृत्यू झाला होता. या वृद्ध दांपत्यांनी केलेल्या जादूटोण्यामुळेच तिचा मृत्यू झाल्याचा संशय मृत महिलेच्या कुटुंबियांनी घेतला. आणि या दाम्पत्याला मारहाण करायला सुरूवात केली. या मारहाणीत या दाम्पत्याचा मृत्यू झाला.

close