भारतीय संघाची नव वर्षातील पहिली कसोटी रविवारी

January 1, 2011 4:44 PM0 commentsViews: 1

01 जानेवारी

भारत आणि दक्षिण आफ्रिकेदरम्यान उद्यापासून तिसर्‍या आणि शेवटच्या टेस्ट मॅचला सुरुवात होत आहे. केपटाऊनमध्ये ही मॅच खेळवली जाईल. सीरिजमध्ये दोन्ही टीम 1-1 मॅच जिंकल्यात त्यामुळे तिसरी टेस्ट सीरिज जिंकण्याच्या दृष्टीनं दोन्ही टीमसाटी महत्वाची ठरणार आहे. डरबन टेस्ट जिंकल्याने भारताचा आत्मविश्वास उंचावला. आणि आता टीम इंडियाचे प्रयत्न आहेत ते सीरिज जिंकण्याचे दक्षिण आफ्रिकेत भारतीय टीमला आतापर्यंत दक्षिण आफ्रिकेत एकदाही सीरिज जिंकता आलेली नाही. त्यामुळे धोणीची टीम इंडिया हा पराक्रम करते का याकडे भारतीय क्रिकेटप्रेमींचे लक्ष लागलं आहे. 2010 वर्षात भारतीय टीम एकही टेस्ट सीरिज हरलेली नाही. आणि नव्या वर्षात हाच रेकॉर्ड कायम ठेवण्याचे भारतीय टीमचं ध्येयं आहे.

close