आरुषी हत्या प्रकरणात तलवार मुख्य संशयित

January 1, 2011 5:03 PM0 commentsViews: 11

01 जानेवारी

नोएडातल्या आरुषी हत्याप्रकरणात तिचे वडील राजेश तलवार हेच मुख्य संशयित आहेत असं सीबीआयने आपल्या अहवालात म्हटलं आहे. आरुषी हत्याप्रकरणी सीबीआयने कोर्टात सादर केलेल्या गोपनीय अहवालाचा तपशील आयबीएन-नेटवर्कच्या हाती लागला. राजेश तलवार हेच एकमेव आरोपी असले तरी पुरेसे पुरावे नसल्याने त्यांच्याविरोधात गुन्हे दाखल केले नसल्याचे सीबीआयने स्पष्ट केले आहे. कुणावरही गुन्हे दाखल झाले नाहीत त्याला अनेक कारण असल्याचे सीबीआयने म्हटलं. गुन्हा करण्याचा स्पष्ट उद्देश आढळला नाही गुन्ह्यात वापरलेले कोणतंही हत्यार सापडले नाही आणि सापडलेल्या पुराव्यांमध्ये अनेक उणीवा आहेत. दरम्यान आरुषीच्या नातेवाईकानी आणि त्यांच्या वकिलांनी सीबीआयचा दावा धुडकावून लावला. सीबीआय नवनवे तर्क मांडतं आहे. सीबीआयने नार्काेटिक्सचा अहवाल सार्वजनिकपणे जाहीर करावा असं आव्हानही त्यांनी दिलं.

close