मुख्यमंत्र्यांकडे राजीनामा देणार नाही !

January 2, 2011 10:04 AM0 commentsViews: 1

02 जानेवारी

आदर्श प्रकरणी मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यायला सांगितलेल्या रामानंद तिवारी आणि सुभाष लाला या दोघांनीही राजीनामा द्यायला नकार दिला होता. आयबीएन नेटवर्कला मिळालेल्या माहिती नुसार या दोन्ही अधिकार्‍यांनी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना आम्ही राजीनामा देणार नाही. कारण राज्य सरकारकडे आमच्या बद्दल ठोस पुरावे नाहीत असं सांगितल्याचे समजतं आहे. आमचा राजीनामा घेण्याचा अधिकारच सरकारला नाही. असं या दोघांनी मुख्यमंत्र्यांना सांगितलं. त्याचवेळी आदर्श प्रकरणाची निवृत्त न्यायधीशामार्फत चौकशी करू असं मुख्यमंत्र्यांनी विधीमंडळात आश्वासन दिलं होतं. पण सरकाला या चौकशीसाठी योग्य असे निवृत्त न्यायाधीशच मिळत नाही. लवकरात लवकर आपण हा आयोग नेमु असं ही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं होतं. पण निवृत्त न्यायाधीशांची निवडच होत नसल्यामुळे आदर्शच्या चौकशीला सुरू व्हायलाच उशीर होइल अशी परिस्थिती होण्याचे चित्र निर्माण होत आहे.

close