पुण्यात आरटीआय कार्यकर्ते अरूण मानेंवर हल्ला

January 2, 2011 10:36 AM0 commentsViews: 9

02 जानेवारी

आरटीआय कार्यकर्ते अरूण माने यांच्यावर पुण्याच्या तळेगाव दाभाडे इथं हा हल्ला झाला. माने वर्षभरापूर्वी हत्या झालेले आरटीआय कार्यकर्ते सतिश शेट्टी यांचे सहकारी आहेत.माने यांनी पोलिसांकडे संरक्षण मागितले होते. आपल्याला सतत धमक्या येत असल्याचा माने यांनी दावा केला होता. तसेच पोलीस संरक्षण देण्याचंही मान्य झालं होतं. मात्र आज (रविवारी ) अज्ञात मारेकर्‍यांनी तळेगाव दाभाडेत माने यांच्यावर मुख्य चौकात हल्ला केला. माने यांना हॉस्पीटलमध्ये दाखल करण्यात आलं असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. गेल्या वर्षभरात आरटीआय कार्यकर्त्यांवर तळेगाव दाभाडे इथं झालेला हा तिसरा हल्ला आहे.येत्या 13 जानेवारीला आरटीआय कार्यकर्ते सतिश शेट्टी यांच्या मृत्युला एक वर्ष पूर्ण होत आहे.

close