सोलापुरात अपंग मुलांचा सांस्कृतीक महोत्सवाला सुरुवात

January 2, 2011 12:49 PM0 commentsViews: 1

02 जानेवारी

सोलापुरात आजपासून तीन दिवस राज्यस्तरीय अंध, मुकबधीर आणि अपंग मुलांचा सांस्कृतीक महोत्सव सुरु झाला. या महोत्सवासाठी राज्यभरातून अंध शाळांचे विद्यार्थी सोलापुरात दाखल झाले आहेत. राष्ट्रीय अंध संघटना म्हणजेच नॅबच्या सोलापूर शाखेचं हे रौप्य महोत्सवी वर्ष आहे. त्यानिमीत्ताने या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवाचे उद्घाटन शिवाजीराव मोघे यांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी हेलन केलरचा वारसा सांगत नाशिक येथील रंजना ओंम्बले या विद्यार्थीनीच्या चमूने सादर केलेल्या मल्लखांब प्रकारातील चित्तथरारक प्रात्यक्षिकांनी सर्वांनाच अचंबित केले.

close