पुण्यात रोलबॉल वर्ल्डकप स्पर्धेचं आयोजन

January 2, 2011 12:58 PM0 commentsViews: 3

गोविंद वाकडे, पुणे

02 जानेवारी

2011 या वर्षात सर्वांना उत्सुकता आहे ती क्रिकेट वर्ल्डकपची. पण त्याआधी भारतीय क्रीडाप्रेमींना आणखी एका वर्ल्डकपची मेजवानी मिळणार आहे.पुण्यात पहिल्या वहिल्या रोल-बॉल वर्ल्डकप स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे.

चपळता, स्फूर्ती, आणि थरार एकत्र अनुभवता येणारा खेळ म्हणजे रोल बॉल. स्केटिंग आणि बास्केट बॉल यांचा मिलाफ या खेळात करण्यात आला. पुण्यातील क्रीडा प्रशिक्षक राजेश दाभाडे यांनी 2003 मध्ये या खेळाची सुरुवात केली. आणि गेल्या आठ वर्षात या खेळाने चांगली लोकप्रियताही कमावली. पुण्यात जन्मलेल्या या खेळाची पहिली वर्ल्डकप स्पर्धाही आता पुण्यातच होत आहे. भारताच्या प्रत्येक राज्यात आणि जिल्ह्यात हा खेळ खेळला जातो. या खेळासाठी केवळ स्केटींग करता येणं इतकंच महत्वाचे नाही तर बास्केट बॉलचे बारकावेही माहित असणे गरजेचं आहे.

16 एप्रील ते 24 एप्रिलदरम्यान ही स्पर्धा खेळवली जाणार आहे. या स्पर्धेसाठी भारतीय टीमची निवड करण्यासाठी पिंपरी चिंचवडमध्ये कॅम्पचे आयोजन करण्यात आलं. देशभरातील अनेक खेळाडूंनी या कॅम्पमध्ये हजेरी लावली. पहिल्या वहिल्या रोलबॉल वर्ल्डकप नाव कोरण्याचा निर्धार या खेळाडूंनी केला.आणि भारतीय टीमला चिअरअप करण्यासाठी पुणेकरही उत्सुक आहेत.

close