थर्टी फस्टला वाहतूक पोलिसांच्या खबरदारीमुळे अपघात टळले

January 2, 2011 3:42 PM0 commentsViews: 5

सुधाकर कांबळे, मुंबई

02 जानेवारी

नववर्षाच्या स्वागतासाठी मुंबई सज्ज होत असताना सर्वाधिक तणाव असतो तो पोलिसांवर. त्यात 31 डिसेंबरला रात्री होणारे अपघात ही तर सगळ्यांच्याच चिंतेची बाब पण यावेळी पोलिसांनी घेतलेल्या खबरदारीमुळे मुंबईत 31 डिसेंबरच्या रात्री एकही अपघात झाला नाही. यावेळी पोलिसांनी मोठ्याप्रमाणात कारवाई केली. सुमारे 860 लोकांवर कारवाई करण्यात आली. तर 79जणांचे वाहनचालक परवाना सहा महिन्यासाठी निलंबित करण्यात आले आहेत. 145 जणांना एक दिवस ते 17 दिवसांसाठी कोठडी देण्यात आली.

मुंबई पोलिसांच्या ट्राफिक विभागाने 31 डिसेंबरच्या मध्यरात्री अभुतपूर्व असा बंदोबस्त ठेवला होता. 31 डिसेंबरच्या रात्री मुंबईकर नव वर्षांच स्वागत करण्यासाठी गेट वे ऑफ इंडिया, जुहू चौपाटी आदी ठिकाणी जमत असतात. नववर्षाचं स्वागत करताना दारुच्या नशेत वाहन चालवणार्‍याची संख्या लक्षणीय असते. नववर्षा निमित्त खबरदारी घेत पोलिस प्रशासनाने अपघात रोखण्यासाठी विशेष मोहीम हाती घेतली आणि ती यशस्वीपणे पार पाडली. ही मोहीम यशस्वी करण्यासाठी हॉटेलमालक आणि टॅक्सीचालकांची मदत घेतली होती.

close