पंतप्रधानांशी मतभेद नाही- मुखर्जी

January 2, 2011 4:51 PM0 commentsViews:

02 जानेवारी

2 जी स्पेक्ट्रम घोटाळ्याप्रकरणी लोकलेखा समितीसमोर जाण्यावरुन पंतप्रधान डॉ.मनमोहन सिंग आणि आपल्या कोणतेही मतभेत नाहीत असं अर्थमंत्री प्रणव मुखर्जी यांनी स्पष्ट केलं. पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी लोकलेखा समितीसमोर चौकशीला जाण्याची तयारी दाखवली होती. मुखर्जी यांनी पंतप्रधानांनी अशी तयारी दाखवण्याची गरज नव्हती असं म्हटलं होतं. पण आता मुखर्जी यांनी या वक्तव्यावर स्पष्टीकरण दिलं आहे. कोणताही मंत्री हा संसदेला जबाबदार असतो लोकलेखा समितीला नाही असंआपलं मत असल्याचं प्रणव मुखर्जी यांनी स्पष्ट केलं.

close