वाढत्या दहशतवादाविरोधात वर्ध्यात मुस्लिम नागरिकांचा मोर्चा

November 2, 2008 5:13 AM0 commentsViews: 2

2 नोव्हेंबर, वर्धादेशात वाढणार्‍या दहशतवादी कारवायांचा निषेध करण्यासाठी वर्ध्यातल्या मुस्लिम नागरिकांनी शांती मार्च काढला. बॉम्बस्फोटानंतर सर्वच मुस्लिमांकडं संशयानं पाहिलं जातं. त्याबाबत अनेकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. राष्ट्रीय एकात्मतेसाठी सर्व धर्मियांनी एकत्र येण्याची गरज मोर्चमध्ये सहभागी झालेल्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केली. यावेळी सर्व प्रकारच्या दहशतवादाचा निषेध करण्यात आला.

close