राज्यभरात क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्त अभिवादन

January 3, 2011 11:58 AM0 commentsViews: 250

03 जानेवारी

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची आज 180 जयंती. राज्यभरात सगळीकडे सावित्रीबाईंची जयंती साजरी होत आहे. एकोणासीव्या शतकात सगळीकडे कर्मठपणाचाचे हैदोस चालला असताना स्त्रीमुक्ती आणि स्त्री शिक्षणाचा ध्यास घेऊन महात्मा फुलेंनी एक वेगळा पायंडा पाडला. आणि त्याची सुरुवात घरापासूनच करत त्यांनी सावित्रीबाईंना शिकवलं. स्वत:च्या पायावर उभं केलं. त्यामुळेच आपल्याबरोबरच सगळ्या महिलांना जागं करत सावित्रीबाईंनी आदर्श वाटचाल केली. समाजाच्या शिव्या सोसल्या, शेणाचा मारही सोसला. पण आपल्या तत्त्वांशी त्या ठाम राहिल्या. म्हणूनच आदर्श महिलांच्या यादीत त्यांना मानाचं स्थानं दिलं जातं. आणि सावित्रीचा हा वसा आजही नेटकेपणाने चालवला जातो.

close