एशियन गेम्समध्ये विजेत्या खेळाडूंचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सत्कार

January 3, 2011 12:46 PM0 commentsViews: 2

03 जानेवारी

चीनमध्ये पार पडलेल्या एशियन गेम्समध्ये मेडल पटकावणार्‍या महाराष्ट्रातल्या खेळाडूंचा आज राज्याचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. सावरपाडा एक्सप्रेस कविता राऊत, कबड्डीपटु स्नेहल साळुंखे, दिपीका जोसेफ, नितीन घुले, कोल्हापूरचा स्विमर वीरधवल खाडे, बिलीयर्डसपटु यासीन मर्चंट, यॉटींग स्टार फारूख तारापोरवाला या खेळाडूंचा यात समावेश आहे. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, उपमुख्यमंत्री अजित पवार हे या सत्कार समारंभाला उपस्थित होते.महाराष्ट्र सरकारतर्फे या खेळाडूंना ट्रॉफी आणि 10 लाख रूपयांचा चेक देण्यात आला.

close