महावितरण कार्यालयासमोर टीव्ही संच फोडून नागरिकांचा निषेध

January 3, 2011 2:38 PM0 commentsViews: 4

03 जानेवारी

औरंगाबादमध्ये वीजपुरवठ्यातील अनियमित दाबामुळे टिव्ही, फ्रीज नादुरूस्त होत असल्याच्या निषेधार्थ आज (सोमवारी) संतप्त नागरिकांनी अनोख आंदोलन केलं. महावितरण कार्यालयासमोर नादूरूस्त झालेला टीव्ही संच फोडून नागरिकांनी आपला निषेध नोंदविला. वारंवार तक्रारी करूनही महावितरण दखल घेत नसल्यामुळंे हे आंदोलन करण्यात आलं. फुलेनगर परिसरातील नागरिकांनी आज महावितरण समोर निदर्शेन केली. महावितरणच्या निषेधाचे फलक घेत नागरिकांनी घोषणाबाजीही केली. या आंदोलनात महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या.

close