बलकवडे यांच्या याचिकेवर 6 जानेवारीला सुनावणी

January 3, 2011 2:57 PM0 commentsViews: 2

03 जानेवारी

पुण्यातल्या दादोजी कोंडदेव यांच्या पुतळ्याप्रकरणी पांडुरंग बलकवडे यांनी दाखल केलेल्या याचिकेवर आज पुणे महानगरपालिकेने कोर्टात उत्तर दिलं. सेशन कोर्टाला या प्रकरणाची सुनावणी करण्याचा अधिकारच नसल्याचा दावा महापालिकेच्या वकिलांनी केला. याप्रकरणाची पुढची सुनावणी आता सहा जानेवारीला होईल. पुणे महापालिकेच्या सर्वसाधारण सभेमध्ये दादोजींचा पुतळा हलवण्याचा निर्णय घेण्यात आल्यानंतर महापालिकेतर्फे बलकवडे यांनी ही केस दाखल केली. त्यामुळे त्यांना ही केस ऐकण्याचा अधिकार नाही, अशी महापालिकेची भूमिका आहे.

सेशन आणि हाय कोर्टात कॅव्हेट दाखल करण्यात आलं होतं. त्यानंतर बलकवडेंनी ही केस दाखल केली. दरम्यान पुतळा हलवण्यात आला. त्यामुळे या कोर्टाला या प्रकरणाची सुनावणी करण्याचा अधिकार नसल्याचं महापालिकेनं म्हणलं आहे. 6 तारखेला कोर्ट या संदर्भातली पुढची सुनावणी करणार आहे.

close