मुंबईत आरटीआय कार्यकर्त्यावर हल्ला

January 3, 2011 4:55 PM0 commentsViews: 14

03 जानेवारी

गेल्या काही दिवसापासून आरटीआय कार्यकर्त्यांवर होणारे हल्ले वाढत चालले आहे. पुण्यानंतर आता मुंबईतही यशवंत गावंड या आरटीआय कार्यकर्त्यांवर काही गुं़डांनी हल्ला केला. गावंड हे भांडूप परिसरात रहात असून गेल्या अनेक दिवसापासून शिवसेनेचे नगरसेवक सुरेश शिंदे यांनी केलेल्या गैरव्यवहाराची माहिती ते माहितीच्या अधिकाराखाली बाहेर काढली.आणि याच माहितीच्या आधार घेऊन त्याने मुंबई हायकोर्टात एक जनहीत याचिकाही दाखल केली होती. या याचिकेवर सुनावणी करताना न्यायालयाने शिवसेनेचे नगरसेवक सुरेश शिंदे यांचं नगरसेवकपद रद्द करण्याचे आदेश महापालिका आयुक्तांना दिले आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर गावंड यांनी आरटीआय ते न्यायालयापर्यंत शिंदे यांच्या विरोधात केलेल्या कारवाईचा रोश धरून शिवसेनेच्या भांडूपमधील काहीकार्यकर्त्यांनी त्यांच्यावर रविवारी हल्ला केल्याचा आरोप यशवंत गावंड यांनी केला.

close