मोहम्मद रफी यांना भारतरत्न द्यावा मागणीसाठी 101 तास गायन

January 3, 2011 5:11 PM0 commentsViews: 7

03 जानेवारी

प्रसिध्द पार्श्वगायक मोहम्मद रफी यांना सरकारने भारतरत्न पुरस्कार द्यावा यासाठी सुनिलकुमार म्हणून नागपूरचा एक तरूण कलाकार सतत 101 तास गाणं म्हणणार आहे. मोहम्मद रफी यांनी गायलेल्या गाण्यांबरोरच इतर सिनेमांमधली गाणीही तो गाणार आहे. नागपूरच्या पत्रकार भवन येथील सभागृहात त्यानी आज सकाळी अकरा वाजता गायनाला सुरूवात केली आहे.. सात जानेवारीला संध्याकाळी सहा वाजता त्याचे 101 तास पूर्ण होतील. नागपूरच्या कलासागर सांस्कृतीक संस्थेच्या वतीने हा उपक्रम राबविला जातो. सुनिलकुमार याने या आधी सतत 26 तास गायनाचा विक्रम केला होता. आता सलग 101 तास गायनाचा गिनिज बुक ऑफ वल्ड रिकॉर्ड मध्ये याची नोंद व्हावी यासाठी हि तो प्रयत्न करतो.

close