कारच्या धडकेत मुंबईत 3 ठार

November 2, 2008 7:46 AM0 commentsViews: 4

2 नोव्हेंबर,मुंबईमुंबईतील बोरिवलीमध्ये सकाळी भीषण अपघात झाला. भरधाव वेगातील कारनं7 जणांना धडक दिली. यात3 जण ठार तर4 जण जखमी झाले आहेत. भरधाव वेगात आलेली कार रस्त्यातल्या डिव्हाडयरला धडकली आणि त्यानंतर टॉयलेटसाठी लागलेल्या रांगेत घुसली. बोरिवलीतील गणपत पाटील नगर इथं हा अपघात घडला. भरधाव कार चालवणार्‍या प्रणव भट याला अटक करण्यात आली आहे. रामनारायण विश्वकर्मा आणि विनोद विश्वकर्मा हे दोघेजण या घटनेत जखमी झालेत. धडक देणारी गाडीचा क्रमांक गुजरातचा असून बोरिवली पोलीस आधिक तपास करत आहेत.

close