बोफोर्स घोटाळ्याचं भूत पुन्हा काँग्रेसच्या मानगुटीवर

January 3, 2011 5:36 PM0 commentsViews: 6

03 जानेवारी

अनेक अडचणींनी घेरलेल्या काँग्रेससमोर आज बोफोर्सचं भूत पुन्हा एकदा येऊन उभं ठाकलं आहे. आयकर विभागाच्या लवादाने आज इटालियन उद्योगपती ओताव्हिओ क्वात्रोची आणि विन चढ्ढा यांना दोषी सिद्ध केलं. दीड हजार कोटी रुपयांच्या बोफोर्स तोफा विकत घेताना क्वात्रोची आणि चढ्ढा यांना दलालीची मोठी रक्कम मिळाली असल्याचं या लवादाने म्हटलं आहे. राजीव गांधी यांच्याशी निकटचे संबंध असलेल्या क्वात्रोचीला सुमारे 41 कोटी रुपये लाच म्हणून दिले गेले होते.आणि म्हणूनच त्याने भारतात आयकर भरायला हवा, असं यात नमूद करण्यात आलं. संरक्षण खरेदीत दलाली देणं कायद्याने गुन्हा असतानाही अशी लाच दिली गेली, हे आता सिद्ध होतं आहे. आणि म्हणून सीबीआयने या केसचा तपास नव्यानं करावा अशी मागणी भाजपने केली. तर अडचणीत सापडलेल्या काँग्रेसने यावर प्रतिक्रिया द्यायला टाळाटाळ केली.

close