औरंगाबादच्या महापालिकेत प्रचंड गदारोळ

January 4, 2011 9:33 AM0 commentsViews: 2

04 जानेवारी

औरंगाबाद महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत शहराच नाव बदलून संभाजीनगर करण्याचा आणि चिकलठाणा विमानतळाला राजे छत्रपती संभाजी भोसले असं नाव देण्याचे ठराव बहुमतानं मंजूर करण्यात आले. मात्र दादोजी कोंडदेव यांचा लालमहालातून पुतळा हलविल्यानंतर आक्रमक झालेल्या शिवसेना-भाजपनं त्यांचा पुतळा उभारण्याचा प्रस्ताव मांडण्याच टाळलं. समिती स्थापन करून त्याबाबत निर्णय घेण्याची भूमिका आता शिवसेनेने घेतली. विशेष म्हणजे शिवसेना- भाजपने मंजूर केलेल्या या दोन्ही ठरावांचे संभाजी ब्रिगेडन स्वागत केलंं. तर काँग्रेस राष्ट्रवादीनं तीव्र विरोध दर्शविला. पुण्याच्या लालमहालातून दादोजी कोंडदेव यांचा पुतळा हलविल्यानंतर औरंगाबाद महानगरपालिकेच्या छत्रपती शिवाजी म्युझियममध्ये त्यांचा पुतळा उभारण्यात येईल अशी भूमिका शिवसेनेनं जाहीर केली होती. प्रत्यक्षात आज झालेल्या सर्वसाधारणसभेत औरंगाबादचे संभाजीनगर करण्याचा आणि चिकलठाणा विमातनळाला राजे संभाजी भोसले असे नाव देण्याचा प्रस्ताव माडंण्यात आला. सभेला सुरूवात होताच, विरोधी आघाडीच्या नगरसेवकांनी जोरदार घोषणाबाजी करीत विरोध दर्शविला.

close