राज्याच्या मुख्य सचिवपदी रत्नाकर गायकवाड यांची नियुक्ती

January 4, 2011 9:46 AM0 commentsViews: 3

04 जानेवारी

राज्याचे नवे मुख्य सचिव रत्नाकर गायकवाड यांनी आज आपल्या पदाचा कार्यभार स्वीकारला. जे.पी. डांगे यांच्याकडून त्यांनी सुत्र स्वीकारली.सोमवारी रात्री उशिरा मुख्यमंत्र्यांनी जे. पी.डांगे यांना मुख्य सचिव पदावरून हटवण्याचा निर्णय जाहीर केला. जे. पी. डांगे यांच्या निवृत्तीला आणखी बराच वेळ असताना त्यांना मुख्य सचिव पदावरून हटवण्याचा निर्णय घेतला गेल्यानं आश्चर्य व्यक्त करण्यात आलं.रत्नाकर गायकवाड या अगोदर एमएमआरडीआय चे आयुक्त म्हणून काम पाहत होते.गायकवाड यांच्यानंतर आयुक्तपदी कोणाची वर्णी लागते याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. यावेळी विविध खात्याच्या अधिकार्‍यांनी गायकवाड यांची भेट घेऊन त्यांना शुभेच्छा दिल्या.

close