आदर्श सोसायटीला कारणे दाखवा नोटीसबद्दल शेवटची संधी

January 4, 2011 9:55 AM0 commentsViews: 2

04 जानेवारी

आदर्श घोटाळ्यासंबंधी पर्यावरण मंत्रालयाच्या कारणे दाखवा नोटीशीला उत्तर देण्याची वेळ आज संपत आहे. 28 डिसेंबरला आदर्श सोसायटीची मागणी मान्य करून पर्यावरण मंत्रालयाने कारणे दाखवा नोटीशीला उत्तर देण्यासाठी 4 जानेवारीपर्यंत मुदत वाढवून दिली होती. पर्यावरणाच्या नियमांचे उल्लंघन करणारी ही 31 मजली इमारत का उध्वस्त केली जाऊ नये, याचं उत्तर देण्यासाठी आदर्श सोसायटीकडे ही शेवटची संधी असणार आहे. पण यासंदर्भात आज निर्णय होणार नसल्याची माहिती सुत्रांकडून मिळत आहे.

close