आर.आर.पाटलांनी माफी मागावी – दिग्विजय सिंह

January 4, 2011 10:18 AM0 commentsViews: 1

04 जानेवारी

मुंबईवर झालेल्या 26/11 हल्ल्यात हेमंत करकरे यांच्या हत्येबाबतच्या वक्तव्यामुळे अडचणीत आलेल्या दिग्विजय सिंह यांनी आज पुन्हा पत्रकार परिषद घेतली हेमंत करकरें यांच्याशी आपलं संभाषण झालं होतं आणि त्याबाबतचे पुरावे आपण गृहमंत्री आर.आर.पाटलांना दिल्याचा दावा दिग्विजय सिंह यांनी केला. तसेच आपल्यावर अविश्वास दाखवणार्‍यांनी आणि आरोप करणार्‍यांनी माफी मागावी अशा मागणीही त्यांनी केली. संभाषणाचे पुरावे गृहमंत्र्यांना दिल्यानंतरही आर.आर.पाटील पुरावे नसल्याचं का म्हणालेत याबाबत त्यांनी आश्चर्यही व्यक्त केलं. तसेच यावेळी दिग्विजयसिंग यांनी संघ आणि आणि भाजपवरही पुन्हा टीका केली.स्वामी असिमानंद यांनी आयोजित केलेल्या शबरीकुंभ मेळाव्यात संघ आणि भाजपचे महत्वाचे नेते उपस्थित होते. याचं स्पष्टीकरण भाजप आणि संघानेे दिलं पाहीजे अशी मागणीही त्यांनी केली.मालेगाव बॉम्बस्फोटप्रकरणी आरोपी सापडल्यानंतर देशात पुणे आणि वाराणसी वगळता कोणतेही मोठे बॉम्बस्फोट झाले नाहीत असं ही त्यांनी म्हटलं.

दरम्यान, आर आर पाटील यांना दिग्विजय यांची माफी मागण्याची गरज नाही असं राष्ट्रवादी काँग्रेसनं स्पष्ट केलं. शहिदांच्या हौतात्म्याचं दिग्विजय सिंह राजकारण करत आहेत त्याचा फायदा पाकिस्तानला होईल असं म्हणत भाजप आणि शिवसेनेनं कलमाडींना फटकारलं.

close