पुणे बंद दरम्यान पोलिसांची चोख कामगिरी – आर.आर.पाटील

January 4, 2011 11:13 AM0 commentsViews: 2

04 जानेवारी

पुण्यात दादोजी कोंडदेव पुतळा प्रकरणी शिवसेनेनं पुकारलेल्या बंद नंतर पोलिसांनी त्यांची भुमिका चोख बजावली आहे. त्यावेळी पोलिसांवर दंगल आणि जाळपोळ टाळण्याची जबाबदारी होती. त्या परिस्थितीत या नेत्यांना ताब्यात घेतलं असतं तर त्यातुन वेगळे प्रकार निष्पन्न झाले असते आणि तणाव वाढला असता त्यांमुळे फोन टॅपिंगनंतर पोलिसांनी काहीही कारवई केली नाही असं स्पष्टीकरण गृहमंत्री आर.आर.पाटील यांनी दिलं. पुण्यात बाबासाहेब पुरंदरे उभारत असलेल्या शिवसृष्टी मध्ये वसुंधरा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते त्यावेळी पत्रकारांशी ते बोलत होते.

close