आयपीएल 4 मधून अनिल कुंबळेचा माघार

January 4, 2011 11:36 AM0 commentsViews: 1

04 जानेवारी

रॉयल चॅलेंजर्स बंगलोरचा माजी कॅप्टन अनिल कुंबळेने आयपीएल 4च्या लिलावातून माघार घेतली आहे. क्रिकेट आणि वनजीवन यामधल्या काही करार आपण केल्यामुळे हा निर्णय घेत असल्याचे अनिल कुंबळेने स्पष्ट केलं. आयपीएलच्या खेळाडूंचा लिलाव 8 आणि 9 जानेवारीला बंगलोरला होत आहे. अनिल कुंबळेसाठी 4 कोटींची रिझर्व्ह किंमत ठरवण्यात आली होती. 2009 साली कुंबळेच्या कॅप्टनशीपखाली बंगलोर रॉयल चॅलेंजर्सने फायनल गाठली होती. तर गेल्या वर्षीच्या आयपीएलमध्ये कुंबळेची टीम तिसर्‍या स्थानावर होती.

close