नवी मुंबईत शिवसैनिकाची हत्या

November 2, 2008 7:50 AM0 commentsViews: 4

2 नोव्हेंबर,मुंबईनवी मुंबईतील ऐरोलीत रात्री साडेबारा वाजता झालेल्या गोळीबारात एक जण ठार तर एक जखमी झाला आहे. नितीन प्रभू असं ठार झालेल्या व्यक्तीचं नावआहे. ते शिवसेनेचे उपशाखाप्रमुख होते. ऐरोली सेक्टर आठ मधील दोन दुकानदारांचे आपसांत पैशावरुन वाद होते. यावरुनच हा गोळीबार झाल्याचं बोललं जातंय. नितीन प्रभू रात्री घरी जात असताना त्यांच्यावर आशा हॉस्पिटलजवळ अज्ञात लोकांनी गोळीबार केला. त्यामध्ये ते जागीच ठार झाले तर त्यांच्यासोबत असणारा अनिरुद्ध सामंत हा जखमी झाला आहे.

close