‘पी एफ’ ची बदली ; युआयडी नंबरची लवकरचं नियुक्ती

January 4, 2011 11:52 AM0 commentsViews: 4

04 जानेवारी

नोकरी बदलताना सगळ्यात किचकट काम असतं ते पीएफ अकाऊंट ट्रान्सफर करण्याचं. अनेकजण या फंदात न पडता नवीन कंपनीसोबत नवा अकाऊंट सुरू करतात. पण आता लवकरच ही अडचण सुटण्याची शक्यता आहे. कारण आता पीएफ अकाउंटची जागा युआयडी नंबर घेणार आहे. एम्प्लॉईज प्रॉव्हिडंड फंड ऑर्गनायझेशन म्हणजेच इपीएफओने अशाप्रकारची योजना आखली आहे. यामुळे पीएफ ट्रान्सफर करणं सोपं होईल. शिवाय ऑनलाईन अपडेट्स पाहणंही शक्य होईल. यासाठी आता इपीएफओची सगळी ऑफिसेस एकमेकांशी नेटवर्कने जोडली जातील. यासाठी मार्च 2012चं उद्दिष्टं ठेवण्यात आलं. आणि त्यानंतर पीएफ नंबरची जागा युनिक आय.डी. नंबर घेईल.

close